Take a fresh look at your lifestyle.

जागतिक रंगभूमी दिन विशेष; जाणून घ्या भारतीय रंगभूमीचा रंगीत इतिहास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आज दिनांक २७ मार्च असून आज संपूर्ण जगभरात जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे कला ही अशी बाब आहे जी माणसाला त्याच्या जिवंत असण्याची मजा देत असते . प्रत्येक कलाकारासाठी आणि कलाप्रेमी साठी आजचा दिवस अत्यंत पूजनीय आणि प्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या दिवसावर इतकं प्रेम करण्याचे कारण काय…? किंवा ही रंगभूमी जी अनेकांसाठी माय आहे तिची उत्पत्ती कुठून आणि कशी झाली…? तर आज आपण जाणून घेऊया या रंगीत रंगभूमीचा ज्वलंत इतिहास…..

भारतीय रंगभूमी फार…… जुनी आहे. म्हणजे अगदी आजपासून बरोबर ६१ वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला खरतर सुरूवात झाली. खरं सांगायचं तर १९६१ सालामध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. पण पहिला जागतिक रंगभूमी दिन हा १९६२ सालीच साजरा झाला आणि त्यानंतर आजही हा दिवस तेव्हढ्याच उत्साहाने जगभर साजरा होतोय. या दिवशी जगभरातील नाट्य जगतातील एक महत्त्वाची व्यक्ती एक अत्यंत महत्वाचा संदेश कलाकारांना देते. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांनी पहिल्यांदा हा संदेश देण्याचा मान मिळवला होता. तर २००२ मध्ये प्रसिद्ध भारतीय नाट्य कलाकार गिरीश कर्नाड यांना हा मान मिळाला.

असं म्हणतात की, नाट्यकलेचा पहिला विकास भारतात झाला. ऋग्वेदातील काही सूत्रांमध्ये यम आणि यमी, पुरुरवा आणि उर्वशी इत्यादींचे काही संवाद आहेत. हे संवाद नाटीकेची निर्मिती ठरले. कारण हे वाचल्यावर इथूनच नाटकाची सुरुवात झाली असावी, असं अनेक अभ्यासक सांगतात. नाटक हे मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं माध्यम म्हणून ओळखंल जात. कितीही चित्रपट पाहिले तरीही नाटक पाहण्याची मजाच काही और असते.

आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना पाहण आणि चालू कथानक जवळून जगणं हे फक्त नाटकातूनचं अनुभवता येत. शिवाय चालू नाटकातील संवाद, हालचाली, हरकती आवडल्यास प्रेक्षकांनी दिलेली दाद ही कलाकारांपर्यंत थेट पोहोचते ही एक पर्वणीच. म्हणून रंगभूमीवरील नाटक हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक माध्यम मानले जाते. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने रंगमंचावर पहिले पाऊल टाकले आणि मराठी रंगभूमी उदयास आली.