Take a fresh look at your lifestyle.

‘पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझें क्या…’; यश आणि परीचा कमाल व्हिडीओ व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. गेल्या १७ डिसेंबरला रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतो आहे. यानंतर आता या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन नुकतंच ओटीटीवर प्रदर्शित झालं. ज्यासाठी मराठी अभिनेता श्रेयस तळपदेनं अल्लू साठी आवाज दिला आहे. सध्या श्रेयस ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत यशवर्धन चौधरी ही भूमिका करतोय आणि त्याच्यासोबत यामध्ये छोटीशी मायरा परीची भूमिका साकारतेय. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालतोय. ज्यामध्ये हे पुष्पा चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यश आणि परी ही दोन्ही पात्र प्रेक्षकांची लाडकी पात्र आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. आधीच ‘पुष्पा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रियता आहे. त्यात डायलॉग आणि गाण्याचं तर काही विचारूच नका. त्यात डायलॉग जर परी स्वतःच्या अंदाजात बोलत असेल तर मग विषयच संपला. एकीकडे इतर जे या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग वर व्हिडिओ बनवत आहेत तिथे परी व्हिडिओ बनवणार नाही असे कसे होईल? तिनेही श्रेयस तळपदेसोबत ‘पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझें क्या…’ या डायलॉगवर व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडिओ श्रेयसने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

परीचा हा व्हिडीओ स्वतः श्रेयस तळपदेनने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आधीच पारीची लोकप्रियता खूप त्यात हा व्हिडिओ पाहून आणखीच वाढली आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. परी आणि श्रेयश ही धम्माल जोडी सध्या या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधून कमाल करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना श्रेयसनं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, ‘जेव्हा ही गोंडस मुलगी ऑर्डर देते तेव्हा तुम्हाला हार मानावीच लागते.’