अनुराग कश्यपची लाइ डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट करा ; पायल घोषची मागणी
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. यासोबतच तिने एफआयआरदेखील दाखल केला होता. यामुळे मुंबई पोलिसांनी अनुरागची तब्बल आठ तास चौकशी केली. मात्र या चौकशीवर पायल घोष समाधानी नाही . अनुराग खोटं बोलतोय असं म्हणत तिने पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे.
अनुराग पोलिसांसमोर खोटं बोलतोय. त्याच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी त्याची नार्को अॅनालिसिस, लाइ डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट करावी. न्याय मिळवण्यासाठी आम्ही पोलिसांना एक विनंती अर्ज देखील करणार आहोत.” अशा प्रकारचं ट्विटपायलने केलं आहे. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील टॅग केलं आहे.
यापूर्वी “अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. ”, असं ट्विट काही दिवसांपूर्वी पायलने केलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’