Take a fresh look at your lifestyle.

अभिनेते प्रकाश राजनी उडवली कंगणाची खिल्ली ; कंगणा झाशीची राणी असेल तर मग हे कलाकार…..

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेते प्रकाश राज उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात.प्रकाश राज हे राजकारणातही ऍक्टिव्ह असतात आणि राजकिय मुद्द्यांवर अनेकदा भाष्यही करत असतात.नुकत्याच सुरू असलेल्या कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादावर प्रकाश राजही भाष्य करत आहेत. आता त्यानी कंगनाला लक्ष्य करत एक मेम शेअर केल आहे ज्यामध्ये त्याने कंगनाला राणी लक्ष्मीबाई म्हणत तिची खिल्ली उडवली आहे.

प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक मीम शेअर केल आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की जर कंगना एखादा चित्रपट करून स्वत: ला राणी लक्ष्मीबाई समजत असेल तर त्यानुसार दीपिका पद्मावती, हृतिक रोशन अकबर, शाहरुख खान अशोक, अजय देवगन भगत सिंह, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉय मोदीजी झाले. प्रकाश राज यांच्या या पोस्टला लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

#justasking

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj) on

यापूर्वीही प्रकाश राज यांनी कंगना राणावतला Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. विमानतळावरील सुरक्षेत कंगना रनौत च्या फोटो सहित पायी चालत चाललेल्या प्रवासी कामगारांचे चित्र शेअर करताना हे न्यू इंडिया असल्याचे त्यांनी म्हणले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’