Take a fresh look at your lifestyle.

आशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ; सुबोध भावेंनी शेअर केली भावुक पोस्ट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता सुबोध भावेनं इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहित आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या, असे सुबोध भावे म्हणाले.

‘प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची ‘माँ’, आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो कृपया काळजी घ्या,’ असं सुबोध भावेनं लिहिलं. यावर्षी फेब्रुवारीमध्ये आशालता यांना शेवटचं प्रत्यक्ष भेटलो तेव्हाचा हा फोटो असल्याचं त्याने पोस्टमध्ये सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Comments are closed.

%d bloggers like this: