Take a fresh look at your lifestyle.

उर्मिला अष्टपैलू अभिनेत्री ; उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न म्हणणाऱ्या कंगणाला राम गोपाल वर्मा यांनी सुनावलं

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तर तिने सॉफ्ट पॉर्नस्टार असं म्हटलं होतं. कंगनाच्या या विधानावर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा संतापले आहेत. उर्मिला एक अष्टपैलू अभिनेत्री आहे, असं म्हणत त्यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे.

“मला शिवीगाळ सुरु असलेल्या स्पर्धेत उतरायचं नाही. परंतु उर्मिला मांतोंडकर एक अष्टपैलू अभिनेत्री आहेत. रंगीला, सत्या, कौन, भूत, एक हसीना यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकर यांचं समर्थन केलं आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही.असे कंगणा म्हणाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’