Take a fresh look at your lifestyle.

उर्मिला मातोंडकरने केला कंगणावर पलटवार ; म्हणाल्या की …..

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडमधील ड्रग रॅकेट मधील वादातून अभिनेत्री कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर एकमेकिंना जोरदार लक्ष्य करीत आहेत. एका मुलाखती दरम्यान कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले होते. आता कंगनाच्या या विधानावर उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, कंगना राणौतने पुराव्यानिशी ड्रग्स घेणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील लोकांची नावे सांगावी. उर्मिला म्हणाली की माझी खरंच इच्छा आहे की की, कंगनाने त्या लोकांना समोर आणावे .. आमच्यावर कृपा होईल.

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, कंगणाकडे आज जो काही पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी आहे यासाठी तिने खरं तर य मुंबई आणि चित्रपटसृष्टीचे आभार मानायला हवं होतं. इतक्या दिवसांपासून ती कुठे होती. यापूर्वी तिने हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत? गेल्या एका महिन्यापासून ती या सर्व गोष्टी बोलत आहे. तीला बॉलिवूडमधील प्रत्येकाचा नक्की काय त्रास आहे?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’