Take a fresh look at your lifestyle.

उर्मिला मातोंडकर फक्त सॉफ्ट पॉर्नसाठी ओळखली जाते ; कंगणाची उर्मिलावर जहरी टीका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत सध्या भलतीच आक्रमक झाली असून तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकाला प्रत्युत्तर देत आहे. अशातच तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर वर एकदम जहरी टीका केली आहे. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणा बोलत होती.

माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अस बोलून आधारावर माझ्यावर आरोप करणे… खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही. उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना?, असं कंगणाने म्हटलं आहे.

या अगोदर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी एबीपी माझाच्या कट्यावर दिलेल्या मुलाखतीत कंगणाला देण्यात आलेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवरून आणि मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मातोंडकर यांनी कंगणाला फटकारलं होतं.

दरम्यान, कंगणाने केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेमुळे तिच्यावरच मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’