Take a fresh look at your lifestyle.

एनसीबीच्या चौकशीत रियाने घेतली दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिया चक्रवर्तीने NCB समोर अनेक धक्कादायक खुलासे केले असल्याची माहिती समोर येत आहे. रियाने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे. NCB ने CNN-NEWS18 ला दिलेल्या माहितीनुसार, रियाने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या कबुली जबाबात गंभीर खुलासे केले आहेत. रियाच्या कबुलीनंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रियाने केलेले खुलासे हे एनडीपीएस अधिनियम कायदा 67 अन्वये अंतर्गत आहेत. रियाच्या कबुलीजबाबानुसार, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे.

लोणावळ्यात सुशांतच्या फार्म हाऊसवरील ड्रग पार्टी मध्ये ती स्वतः नव्हती अस रियाने सांगितलं. परंतु त्याचवेळी रियाने 2 प्रसिद्ध पुरुष कलाकारांची नावंही NCB दिली आहेत. ज्यांचा आता NCB कडून कसून तपास होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’