Take a fresh look at your lifestyle.

एबीसीडी फेम अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग प्रकरणी अटक

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. चौकशीदरम्यान रियाने अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या अनेक कलाकारांची नावं घेतली. त्यानंतर एनसीबीने कारवाई करण्यास सुरुवात केली.ही कारवाई सुरु असतानाच क्राईम ब्रांचने बॉलिवूड अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. स्वत:जवळ ड्रग्स बाळगल्या प्रकरणी त्याला क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे.

किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर असून ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. दिग्दर्शक रेमो डिसुझाच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटात देखील तो झळकला होता. अंमली पदार्थ विरोधात कारवाई करताना या कारवाई दरम्यान बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावं समोर आली आहेत. यापैकी एक नाव किशोर शेट्टी हे होते. क्राईम ब्रांचला त्याच्या जवळ ड्रग्स सापडले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’