Take a fresh look at your lifestyle.

कंगनाने दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; म्हणाली की आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत ..

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांचा जन्म गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील वडनगर येथे झाला. नरेंद्र मोदींनी लहानपणापासूनच संघर्ष केला. त्यांच्या संघर्षांचा परिणाम म्हणूनच आज ते एक प्रभावशाली नेता म्हणून जगभरात ओळखले जातात. त्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वाढदिवसानिमित्त जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्याचवेळी, या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एका व्हिडिओद्वारे पीएम मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाने एक व्हिडीओ ट्विट करत म्हटले आहे की, ‘माननीय पंतप्रधान, तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला तुमच्याशी बोलण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण मला सांगायचे आहे की हा देश तुमची प्रशंसा करतो.

कंगना पुढे म्हणाली, ‘जेव्हा जेव्हा मी बघते की सामान्य भारतीय तुम्हाला ज्या नजरेने पाहतो तेव्हा मला अस वाटत की इतका आदर व, एवढी भक्ती आणि प्रेम यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांना देण्यात आले आहे. मला एवढेच सांगायचे आहे की सोशल मीडियावर नसलेले कोट्यावधी भारतीय, ज्यांचे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, ते सर्व आज तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करीत आहेत. आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान लाभले. जय हिंद.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’