Take a fresh look at your lifestyle.

करण जोहरने लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र ; बॉलीवूड बद्दल सांगितली ‘ही’ गोष्ट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गांधी जयंतीनिमित्त चित्रपट निर्माते करण जोहर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण केल्याने बी-टाऊनच्या योजनांवर प्रकाश टाकला.करण जोहर यांनी आपल्या ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक चिठ्ठी शेअर केली.

गांधी जयंतीनिमित्त चित्रपट निर्माते करण यांनी शेअर केले की चित्रपट स्वातंत्र्याची 75 वर्षे झाल्याने जल्लोष साजरी करण्याची विशेष योजना असून स्वतः करण जोहर भारताच्या शौर्य, मूल्ये आणि संस्कृतीविषयी प्रेरणादायक कंटेंट तयार करीत आहेत.

करणने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘गांधी जयंतीनिमित्त सर्जनशील प्रेरणादायक कन्टेन्ट तयार करण्यासाठी प्रत्येकजण एकत्र आला आहे!’ यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले.त्यात असे लिहिले आहे की, ‘आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी … भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आपल्या महान राष्ट्राच्या कथा सांगण्यास आम्ही उत्सुक आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’