Take a fresh look at your lifestyle.

कृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत होईल – अनुपम खेर यांनी शेअर केला खास व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सध्या शेतकरी आणि शेती विषयक विधेयकांचा मुद्दा देशात फार गाजतोय. यामध्येच आता अभिनेते अनुपम खेर यांनी एक विधान केलं आहे.  कृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत होईल अस ते म्हणाले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करत त्यांच्या चित्रपटातील जुना व्हिडिओ शेअर केला आहे.यातून इतकंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांची अवस्था ही त्यावेळीही वाईट होती आणि आजही वाईटच आहे.

आता जी कृषी विधेयकं पास झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत होईल असा विश्वास आहे. कधी कधी सिनेमा आणि सत्य स्थिती सारखी असते. पण नव्या बिलांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. असं खेर यांनी सांगितलं आहे.तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’