Take a fresh look at your lifestyle.

चित्रपटगृह सुरू होऊनही अक्षयचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीला प्रदर्शित होणार नाही ????

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | केंद्र सरकारने अनलॉक 5 अंतर्गत सशर्तपणे थिएटर्स उघडण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे काही चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होण्याची आशा प्रेक्षकांना आहे. निर्मात्यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळी मध्ये रिलीज होईल अशी आशा होती पण आता आलेल्या ताज्या बातम्यांनुसार सूर्यवंशी दिवाळीला येणार नाहीत.

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचा हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक प्रलंबीत चित्रपट होता आणि तो 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचवेळी कोरोना विषाणूचा साथीचा परिणाम देशाला बसला आणि थिएटर बंद पडलं, ज्यामुळे सूर्यवंशी प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलली.

आता 50 टक्के क्षमतेसह 1 ऑक्टोबरपासून थिएटर्स सुरू करण्याच सरकारने सांगितलं आहे. केंद्र सरकारने यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत, त्या पाळाव्या लागतील. तथापि, सूर्यवंशी अद्याप दिवाळीला येणार नाहीत.

रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुप सीईओ शिबाशिश सरकार यांनी पीटीआयशी बोलताना यामागील कारण उघड केले. सरकारच्या निर्णयामुळे शिबाशिष खूष आहेत, पण सूर्यवंशी शॉर्ट नोटीसवर रिलीज करणे त्यांना शक्य नाही. सरकार म्हणाले – “एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही दिवाळीनिमित्त कोणताही चित्रपट प्रदर्शित करत नाही.” इतर कोणताही निर्णय झालेला नाही. दिवाळीत आता हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता नाही.

रोहित शेट्टी यांच्या कॉप युनिव्हर्समधील सूर्यवंशी हा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर त्याने सिंघम आणि सिंबा हे चित्रपट केले आहेत. चित्रपटात अक्षय सोबत अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात कॅमिओसमध्ये दिसणार आहेत. सूर्यवंशीची निर्मिती रोहित शेट्टी पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स आणि करण जोहर यांची कंपनी धर्म प्रोडक्शन्स यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’