Take a fresh look at your lifestyle.

जर कोणी ‘ही’गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर मी ट्विटर कायमचं सोडेन – कंगणा राणावत

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर आता ती महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर सातत्याने आरोप करत आहे. त्यातच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तर तिने सॉफ्ट पॉर्नस्टार असं म्हनून त्यात आणखी भर घातली.. मात्र या संपूर्ण वादावर आता कंगना रणौत पडदा टाकण्यासाठी तयार आहे. ही लढाई कंगनाने सुरु केली, असं कोणी सिद्ध करुन दाखवलं तर ती ट्विटर कायमचं सोडून देईल, असं आव्हान तिने दिलं आहे.

“लोक मला भांडखोर प्रवृत्तीची व्यक्ती समजतात, परंतु हे असत्य आहे. आजवर कधीही मी स्वत:हून लढाई सुरु केलेली नाही. समोरुन आरोप झाल्यानंतरच मी प्रत्युत्तर दिलं आहे. या लढाईची सुरुवात माझ्यामुळे झाली हे जर कोणी सिद्ध करुन दाखवलं तर मी ट्विटर कायमचं सोडून देईन. ही लढाई कायमची संपवेन. भगवान श्री कृष्ण यांनी सांगितलय जर कोणी लढाईसाठी आव्हान देत असेल तर त्या आव्हानाला नकार देऊ नका.” अशा आशयाचं ट्विट कंगना रणौतने केलं आहे.

यापूर्वी टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळणार हे नक्की.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’