Take a fresh look at your lifestyle.

जेनेलिया करणार बॉलीवूड मध्ये कमबॅक? ‘ही’ भूमिका साकारण्यासही तयार

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टी वरून चर्चेत असतात. रितेश सोबत लग्न झाल्यापासून जेनेलियाचा अभियन क्षेत्रातील वावर कमी झाला आहे. लग्नानंतर तिने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, आता पुन्हा एकदा जेनेलियाला मोठा पडदा खुणावत असून तिने चित्रपटांमध्ये कमबॅक करण्याविषयी विचार सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत तिने चित्रपटात काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे.

लग्नानंतर कलाविश्वातून ब्रेक घेत जेनेलिया तिच्या संसारात रममाण झाली होती. घर आणि मुले यांना ती जास्तीत जास्त वेळ देत होती. मात्र, आता तिने पुन्हा एकदा करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कदाचित येत्या काळात जेनेलिया पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यासंदर्भात जेनेलिया म्हणाली की खरंतर घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मी दुसरीकडे माझं कामदेखील मिस करत होते. मात्र, चित्रपटांच्या सेटवर लहान मुलांना घेऊन जाणं वगैरे या गोष्टी मला करायच्या नव्हत्या. मला माझं पूर्ण लक्ष कामाकडेच द्यायचं होतं. आता माझी मुलं बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. त्यामुळे आता मी पुन्हा माझ्या कामाकडे वळू शकते. एखाद्या चांगल्या भूमिकेच्या मी प्रतिक्षेत आहे. तसंच जर मला एखाद्या आईची भूमिका मिळाली, तरीदेखील मी ती करण्यास उत्सुक असेन.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’