ड्रग्जचा विषय सोडा आणि सुशांतला कोणी मारलं आणि का मारलं ते आम्हाला सांगा ; शेखर सुमन संतापले
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन 3 महिने झाले तरीही या मृत्यूबाबतच गूढ अजून उलगडल नाही. या प्रकरणाचा तपास करीत असताना ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेता शेखर सुमन यांनी संताप व्यक्त केला आहे. ड्रग्जचा विषय सोडा आणि सुशांतला कोणी मारलं आणि का मारलं ते आम्हाला सांगा, असं म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
“ड्रग्ज घेणाऱ्यांना मरु द्या.. त्यांना तुरुंगात टाका.. त्यांना देशातून बाहेर काढा.. त्यांना चित्रपटातून बाहेर काढा.. आम्हाचं या प्रकरणाशी काही देणघेणं नाही. फक्त सुशांतसोबत काय घडलं होतं ते सांगा? सुशांतची हत्या कोणी आणि का केली? कुठे गेले पिठाणी, नीरज, सॅम्युअल, कूक, रुग्णवाहिकेचा चालक, नकाब वाली तरुणी? कुठे गेली ही गँग काही तरी सांगा?” अस ट्विट शेखर सुमन यांनी केलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेखर सुमन सुशांत मृत्यू प्रकरणावर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत.
सुशांत आत्महत्या प्रकरणापासून शेखर सुमन याबाबत प्रतिक्रिया देत असून ते नेहमीच सुशांतच्या न्यायाची मागणी करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’