Take a fresh look at your lifestyle.

ड्रग प्रकरणी एनसीबी कडून प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होण्याची शक्यता

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंहच्या राजपूतच्या आत्महत्येच गूढ अजून उलगडलेले नसले तरी या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान कलाविश्वातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांत आत्महत्ये प्रकरणी आता पर्यंत अनेक जणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूड मधील घराणेशाही आणि गटबाजी या गोष्टींमुळे लोकांच्या निशाण्यावर असणारा दिग्दर्शक करण जोहर देखील आता एनसीबीच्या रडारवर आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाची तपासणी करणारी एनसीबी यंत्रणा सध्या ड्रग्स ऍगलवर चौकशी करत आहे. त्यामुळे ३० जुलै २०१९ रोजी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी एनसीबी करणार असल्याची शक्यता आहे. 

३० जुलै २०१९ रोजी करणच्या  घरी एक पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये अर्जुन कपूर, वरुण धवन,मलायका अरोरा, रणबीर कपूर, विकी कौशल, दीपिका पादुकोण, अयान मुखर्जी, झोया अख्तर यांसारखे कलाकार उपस्थित होते. 

दरम्यान, शुक्रवारी एनसीबीने ड्रग्ससंदर्भात मोठा खुलासा केला. १५ बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांची नावं अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर समोर आली आहेत. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’