Take a fresh look at your lifestyle.

तक्रार करण्यापेक्षा काम करा ; घराणेशाहीच्या मुद्द्यावरून जॉन अब्राहमने सुनावले

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने इंडस्ट्रीमध्ये स्वतः अथक परिश्रम करून स्वतःचे नाव कमावले आहे. त्याला कोणताही गॉडफादर नव्हता. जॉन आपल्या कष्टाने आज या टप्प्यावर पोहोचला आहे. अलीकडेच जॉन अब्राहमने बॉलीवूड मधील घराणेशाही आणि अंतर्गत-बाहेरील चर्चेबद्दल आपले मत व्यक्त केलं आहे. त्याने त्याची तुलना ट्विटर ट्रेंडिंग टर्मशी केली.

नुकताच एका मुलाखती दरम्यान जॉन अब्राहम म्हणाला की प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास असतो. त्यांची आव्हाने असतात आणि इथे या उद्योगात दोनच पर्याय आहेत, एकतर काम करा किंवा दुसऱ्यावर टीका करत बसा. जॉन पुढे म्हणतो की जेव्हा मी माझ्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात केली तेव्हा मी एक बाहेरचा व्यक्ती होतो.आज जवळपास २० वर्ष मी काम करतोय. अडथळे तर येतातच पण तक्रारी करुन काहीही सिद्ध होत नाही.” अशी प्रतिक्रिया जॉन अब्राहम याने दिली.

जॉन अब्राहम यांनी यांनी कोणाचीही बाजू न घेता सावधपणे भूमिका घेतली आहे. इंडस्ट्रीत येणाऱ्या तरुणांसाठी त्याने बर्‍याच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. जॉन सध्या संजय गुप्ताच्या मुंबई सागा या गुन्हेगारी ड्रामा फिल्ममध्ये व्यस्त आहे. तसेच जॉनकडे सत्यमेव जयते 2 आणि अटॅक हे आणखी दोन चित्रपट आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’