Take a fresh look at your lifestyle.

तुला फेमिनिज्म मधील एफ तरी माहीत आहे का ?? अर्शी खानने कंगणाला सुनावले

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हे सध्या आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच कंगणाने जया बच्चन आणि उर्मिला मातोंडकर यांनाही लक्ष्य केले. आता बिग बॉसची माजी स्पर्धक अर्शी खान हिने कंगना रनौतला लक्ष्य केले आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून तीव्र निषेध करताना दिसत आहे. अर्शी खानचा हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे.

“कंगना रनौत, तु स्त्रियांच्या सन्मानाबद्दल बोलते. स्त्रीत्ववाद. तुम्हाला स्त्रीत्ववादाबद्दलही माहिती आहे.तू फेमिनिज्म बद्दल बोलते पण तुला फेमिनिज्म मधील एफ तरी माहीत आहे का ?? तू स्त्री च्या आदरा बद्दल बोलतेस पण जेव्हा दुसऱ्या स्त्री बद्दल किंवा अभिनेत्री बद्दल बोलताना तू त्यांना बी वर्गाची अभिनेत्री, सी श्रेणी, सॉफ्ट पॉर्न म्हणतेस. तुला जर कोणी काय बोलले तर तू भाजपला मध्ये आणते.आणि भाजप कडून तुला वाय दर्जाची सुरक्षा सुद्धा मिलते.असं अर्शी खान म्हंणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Comments are closed.