Take a fresh look at your lifestyle.

तू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून आली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. 2014 साली अनुराग कश्यपने आपल्यावर जबरदस्ती केली होती, असं पायलने सांगितलं आहे. इतक्या वर्षांनंतर पायल घोषने अनुराग कश्यप वर आरोप केला आहे. नेमकं तिच्यासह अनुरागने काय केलं होतं. ते तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. अनुराग ने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

परंतु याच दरम्यान मराठी अभिनेत्री अमृता सुभाष मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मदतीला धावून आली आहे. तिने यासंदर्भात ट्विट केलं आहे. यासंदर्भात तिने एक ट्विट केलं आहे.

तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तू अत्यंत प्रामाणिक व्यक्त आहेत. तू नेहमीच मला आदरानं वागवलं आहेस. मी कधीच शब्दात तुला हे सांगितलं नाही..कारण मला कधीच त्याची गरज वाटली नाही. मात्र आज मला तुझे आभार मानायचे आहे. तू मला दिलेल्या आदरासाठी खूप धन्यवाद.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’