Take a fresh look at your lifestyle.

नवाजुद्दीनची पत्नी आलियाने नवाज आणि कुटुंबियांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांकडे नोंदवला जबाब

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यामधील घटस्फोट आणि कौटुंबिक छळाचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नुकतंच नवाजची पत्नी आलियाने बुढाना येथील पोलिस स्टेशनमध्ये नवाज आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तिचा जबाब नोंदवला आहे.

आलियाने तिचा हा जबाब नवाज आणि त्याच्या कुटुंबियांनी लावलेल्या आरोपाच्या आधारावर नोंदवला आहे. २७ जुलै रोजी आलियाने मुंबईतील एका पोलिस स्टेशनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केली होती. हे प्रकरण मुंबईतील नसल्याने मुजफ्फरनगरमधील बुढाना येथे ट्रान्सफर केलं गेलं. या एफआयआरनुसार आलियाला तिचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबईहून बुढानाला यावं लागलं.

आलियाने तिच्या जबाबामध्ये पुन्हा एकदा तेच आरोप केले आहेत जे तिने मुंबईतील एफआयआरमध्ये सांगितले होते. आलियाने आरोप केला आहे की २०१२ मध्ये नवाजच्या भावाने तिच्यासोबत छेडछाड केली होती. याबद्दल तिने त्याच्या कुटुंबियांकडे देखील तक्रार केली होती. मात्र हे प्रकरण वाढू नये यासाठी कुटुंबियांनी तिला गप्प राहायला सांगितलं. कुटुंबियांचं म्हणणं होतं की ही घरातली गोष्ट आहे तेव्हा ती घरातंच सोडवली गेली तर उत्तम. मात्र नवाजच्या भावावर घरातील सदस्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

दुसरीकडे नवाजचे कुटुंबिय आलियाच्या सगळ्या आरोपांना फेटाळून लावत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आलिया खोटं बोलत असून अशा प्रकारची कोणतीही घटना त्यांच्या घरात घडलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’