Take a fresh look at your lifestyle.

“पार्टीमध्ये बोलवून मला जबरदस्ती ड्रग्स देण्याचा प्रयत्न केला होता ; शर्लिन चोप्राचा धक्कादायक गौप्यस्फोट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतने खळबळजनक आरोप करताना म्हणलं होत की बॉलिवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात.” तिच्या या आरोपामुळे खरंच बॉलिवूडमधील कलाकार खरंच ड्रग्स घेतात का? असा एक नवा वाद सुरु झाला. या वादात आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने उडी घेतली आहे. चित्रपटसृष्टीतील काही मंडळींनी मला जबरदस्तीने ड्रग्स देण्याचा प्रयत्न केला होता, असा अनुभव तिने सांगितला आहे. शर्लिनने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.

शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. “मला धुम्रपानाचं व्यसन होतं. परंतु ऑक्टोंबर २०१७ मध्ये मी धुम्रपान करणं कायमचं सोडलं. मी कधीतरी मद्याचं सेवन करते. परंतु ड्रग्स कधीही घेतलेले नाहीत. चित्रपटसृष्टीतील काही मंडळी मला ड्रग्स घेण्यासाठी जबरदस्ती करायचे. मी मात्र त्यांना कायम नकार दिला आहे.” अशा प्रकारची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करुन शर्लिनने ड्रग्स बाबतचा अनुभव सांगितला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’