Take a fresh look at your lifestyle.

बाॅलिवुडला आणखी एक धक्का! संपुर्ण कपूर घराणं होतं त्याचे फॅन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध मॉडेल जुनैद शाह याचं निधन झालं आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा डुप्लीकेट म्हणून तो प्रसिद्ध होता. गुरुवारी रात्री श्रीनगरमधील राहत्या घरी त्याचं कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. काश्मिरमधील प्रसिद्ध पत्रकार यूसुफ जुनैद यांनी त्याच्या निधनाची बातमी दिली.

“निसार अहमद शाह यांचा मुलगा जुनैद शाह याचं काल रात्री कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्याला आपण रणबीर कपूरचा डुप्लीकेट म्हणून ओळखायचो. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.” अशा आशयाचे ट्विट करुन त्यांनी जुनैदला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

काश्मीरमध्ये राहणाऱ्या जुनैदला बॉलिवूडचे प्रचंड आकर्षण होते. तो हुबेहुब रणबीर कपूर सारखा दिसायचा त्यामुळे अल्पावधीत त्याला प्रसिद्धीही मिळाली होती. जुनैद काश्मिरमधील अनेक लोकल बँड्सच्या जाहिरातींमध्येही झळकला होता. सोशल मीडियावरही त्याची चांगलीच फॅन फॉलोईंग होती. ऋषी कपूर देखील जुनैदच्या लूकचे फॅन होते. त्यांनी ट्विट करुन त्याचं कौतुक केलं होतं. जुनैदच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments are closed.