हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलीवूड मध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दररोज बॉलिवूडमधील नवनव्या कलाकारांची नावं समोर येत आहेत. आतापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोन , सारा अली खान,यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत.
दरम्यान एका मराठी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचं नाव आता या ड्रग प्रकरणात समोर आलं आहे. त्यामुळे चौकशीसाठी नम्रता शिरोडकरला बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नम्रताने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू याच्यासोबत विवाह केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीत फार सक्रिया नाही.
सध्या बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण हीचं नाव देखील या तपासात समोर आलं आहे. सगळ्यात आधी करिश्माची चौकशी करण्यात येईल त्यानंतर गरज पडल्यास दीपिकाला समन्स बजावण्यात येईल असं एनसीबी नं म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’