Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड अभिनेत्री सुजान खानच्या आईला कोरोनाची लागण

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | देशभरात कोरोनाचा प्राधुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घाललं आहे. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली असून यात अनेक सेलिब्रिटींचादेखील समावेश असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता हृतिक रोशनची एक्स वाइफ सुझान खान हिच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे.

सुझानची बहिणी फराह खान अली हिने ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या आईला जरीन कतरक यांना करोना झाल्याची माहिती दिली आहे. “माझ्या आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून योग्य ते उपचार सुरु आहेत. कृपया सगळ्यांनी मास्कचा वापर करा”, अशी पोस्ट फराहने केली आहे.

दरम्यान, देशभरात अनेक सेलेब्रिटी तसेच राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.आतापर्यंत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर या सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली होती.