Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माझ्या पार्टीत ड्रग आणले नव्हते ; करण जोहरने दिले स्पष्टीकरण

tdadmin by tdadmin
September 26, 2020
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बॉलीवूड मधील ड्रग प्रकरण समोर आले आहे. त्यातच आता ड्रग्ज प्रकरणी दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याची चौकशी होण्याची शक्यता आहे. २८ जुलै २०१९ रोजी करण जोहरच्या घरी ड्रग्ज पार्टी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे एनसीबी करणची चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, ‘माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते’, असं स्पष्टीकरण करण जोहरने दिलं आहे. करणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

“माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते. यापूर्वीदेखील मी सांगितलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. आमच्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणण्यात आलेच नव्हते आणि कोणी त्याचं सेवनही केलं नव्हतं. धर्मा प्रोडक्शनविषयी माध्यमांमध्ये चुकीच्या गोष्टी येत आहेत. तसंच क्षितिज रवि प्रसाद व अनुभव चोप्रा या दोन व्यक्तींचा आणि धर्मा प्रोडक्शनचा संबंध जोडण्यात येत आहे. त्यांचा आणि माझा किंवा धर्मा प्रोडक्शचा कोणताच संबंध नाही. तसंच मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत देखील नाही. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे राहतात किंवा काय करतात याच्याशी मला किंवा धर्मा प्रोडक्शनला काही घेणं-देणं नाही”, असं करण म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहर पुढे म्हणाला, “मी ड्रग्सचं सेवन करत नाही आणि अशा गोष्टींसाठी कधी कोणाला प्रोत्साहन किंवा पाठिंबादेखील देत नाही”.

दरम्यान, करण जोहरच्या पार्टीत बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. दीपिका, विकी कौशल, रणबीर कपूर, वरुण धवन, झोया अख्तर, शाहीद कपूर, मलायका अरोरा सहित अनेक सेलिब्रेटी पार्टीत उपस्थित होते. पार्टीत हजेरी लावलेल्या सर्व सेलिब्रेटींना एनसीबीकडून समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Tags: Karan johar
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group