Take a fresh look at your lifestyle.

‘माल’ नाही तर रसिकांचे ‘मोल’ महत्त्वाचे ; केदार शिंदेंच ट्विट चर्चेत

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात तपास सीबीआय तसेच एनसीबी करत असून या प्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचं समोर आल आहे. हा तपास सुरू असतानाच बॉलीवूड मधील ड्रग रॅकेट समोर आले. त्यावरून ‘एनसीबी’ने अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर व राकूलप्रीत सिंह यांची चौकशी केली आहे. यानंतर किंग खान शाहरुखचं नाव समोर आल्यानं खळबळ माजली आहे. याच पार्श्नभूमिवर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर माल, हॅश , वीड हे शब्द चर्चेत आहेत. बॉलिवूडमध्ये सिगारेटला माल म्हटलं जात असल्याचं दीपिकानं सांगितल्यानंतर केदार शिंदेश यांनी मराठी चित्रपट सृष्टीत ‘माल’ म्हणजे काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.

केदार शिंदे ट्विट करत म्हणतात की ‘अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘माल’ नाही तर, रसिकांचं ‘मोल’ महत्वाचं ठरतं’, असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’