Take a fresh look at your lifestyle.

मी घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले तर ….पायल घोषच धक्कादायक वक्तव्य

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोष हिनं अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत काही धक्कादायक खुलासेही केले.या घटनेनंतर संपूर्ण बॉलीवूड मध्ये खळबळ उडाली. इतकंच नव्हे, तर तिनं या प्रकरणी थेट पोलिसांचं दारही ठोठावत अनुराग विरोधात तक्रारही दाखल केली. आता पुन्हा एकदा पायलने धक्कादायक वक्तव्य केले आहे. मी घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले तर एक लक्षात ठेवा, मी आत्महत्या केलेली नाही.अस ती म्हणाली आहे.

सोशल मीडियावर पायलनं स्वत:चा एक फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मिस्टर अनुराग कश्यपविरोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत काही खुलासे केले होते. ज्यानंतर मला कळलं की त्यासाठी खुद्द अनुराग कश्यप यांच्याच परवानगीची गरज होती असं मला कळलं’. देशातील जनतेला उद्देशून पायलनं लिहिलं, ‘मी घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले तर एक लक्षात ठेवा, मी आत्महत्या केलेली नाही. त्यांच्याकडे माझ्या नैराश्याची आणि औषधोपचाराची कहाणी तयार आहे’. अस पायल म्हणाली.

काही दिवसांपूर्वी पायल घोषने अनुराग कश्यपवर धक्कादायक आरोप करताना अनुरागने तिच्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’