Take a fresh look at your lifestyle.

मोजक्या लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला दोषी समजणं योग्य नाही ; ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला स्वतःचा ड्रग टेस्ट रिपोर्ट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपास सुरू असतानाच आता या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री टिया वाजपेयीने स्वत:ची ड्रग्ज टेस्ट करुन त्याचा रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रिपोर्टच्या माध्यमातून तिने बॉलिवूडला पाठिंबा दिला आहे.

https://www.instagram.com/p/CFg8jy7DzGy/?utm_source=ig_web_copy_link

टियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने आपल्या ड्रग्ज टेस्टचा रिपोर्ट चाहत्यांना दाखवला आहे. “सिनेसृष्टीत काम करणारे काही मोजके लोक अंमली पदार्थांचं सेवन करत असतील. परंतु त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडला दोषी समजणं योग्य नाही. बॉलिवूड कलाकारांवर खोटे आरोप केले जातायेत. त्यामुळे टीकाकारांच्या समाधानासाठी मी स्वत:ची ड्रग्ज टेस्ट केली आहे. हा पाहा माझा रिपोर्ट. कृपया सर्व कलाकारांना एकाच तराजुमध्ये तोलू नका. काही जण खरोखरच प्रामाणिकपणे काम करत आहेत.” अशी विनंती तिने या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’