Take a fresh look at your lifestyle.

यूजरने शेअर केला सुशांतच्या अंत्यदर्शनाचा व्हिडिओ ; अंकिता लोखंडेने सुनावले खडेबोल

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला 3 महिन्यांहून अधिक काळ झाला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. पण सुशांतचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याच गूढ अद्याप समोर आले नाही. परंतु सुशांतचे चाहते आणि कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल अशी सर्वांची अपेक्षा आहे.

याच दरम्यान एका यूजर ने ट्विटरवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) संतापली आणि तिने त्या युजरला चांगलेच सुनावले .,अंकीताने हा व्हिडीओ त्वरित डिलिट करण्यास सांगितले आहे.

एका ट्विटर युजरने शेअर केलेला हा व्हिडीओ सुशांतच्या अंत्यसंस्कारा दरम्यानचा आहे. या युजरने हा व्हिडीओ शेअर करताना असे लिहले आहे की, ‘मला हा व्हिडीओ शेअर करायचा नव्हता पण या कारणामुळे शेअर केला आहे की, जेव्हा कधी बॉलिवूड सिनेमा पाहायचे मनात येईल तेव्हा हा चेहरा लक्षात ठेवा.’

अंकिताने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिने असे लिहले आहे की, ‘तुम्हाला काय झाले आहे? असे व्हिडीओ शेअर करणं बंद करा. तुम्हाला विनंती करते की त्वरित हा व्हिडीओ डिलीट करा. मला माहिती आहे की तुमचे त्याच्यावर प्रेम आहे, पण पाठिंबा देण्याची ही पद्धत नव्हे. हा व्हिडीओ डिलीट करा.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’