Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवस स्पेशल : जाणून घेऊ करीना आणि सैफ ची लव्ह स्टोरी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. करीना कपूर बॉलीवूड मध्ये एका रोल मॉडेल पेक्षा कमी नाही.तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. आज २१ सप्टेंबर रोजी करिनाचा वाढदिवस आहे. २०१२ मध्ये तिने आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. सैफ आणि करिनाची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या दोघांची प्रेमकथाही तितकीच रंजक असल्याचं सांगण्यात येतं.

एक काळ असा होता की करिना कपूर आणि शाहिद कपूरच्या रोमान्सची चर्चा होती. पण नंतर सैफ ची एन्ट्री झाली आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला.टशन’ आणि ‘कुर्बान’ या चित्रपटात सैफ आणि करीनाची रोमॅण्टीक केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर लगेच या जोडीने लग्नाचा निर्णय घेता आणि ही जोडी विवाहबंधनात अडकली. 16 ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांनी मुंबई मध्ये लग्न केले.करीनाने तेव्हा असा निर्णय घेतला होता की ती तिचे आडनाव खान लावेल पण हिंदू धर्माचे पालन सुद्धा करेल. सध्या ही जोडी त्यांच्या वैवाहिक आयुष्य जगत असून त्यांना तैमूर हा लहान मुलगादेखील आहे.

करीना आणि सैफ अली खान यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यामध्ये ओमकारा, तशान, कुरबान आणि एजंट विनोद या चित्रपटांचा समावेश आहे. 2020 साल करीनासाठीसुद्धा खास आहे कारण ती दुसऱ्यांदा आई बनणार आहे.