Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवस स्पेशल : ‘या’ अभिनेत्री साठी महेश भट्ट यांनी चक्क धर्मच बदलला होता

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आज जन्मदिवस आहे. ‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘सडक’ या प्रसिद्ध चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. बॉलिवूडला एकाहून एक उत्तम चित्रपट देणारे महेश भट्ट त्यांच्या चित्रपटांमुळे जितके चर्चेत असतात तितकेच ते खासगी आयुष्य आणि वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असतात. इतकंच नाही तर त्याकाळी महेश भट्ट यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा विशेष रंगल्या गेल्या होत्या. त्यांनी चक्क लग्नासाठी आपला धर्म बदलला होता, असं म्हटलं जातं.

महेश भट्ट यांची सोनी राजदानसोबतची लव्हस्टोरी साऱ्यांनाच माहित आहे. विशेष म्हणजे सोनी राजदान यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता. सोनी राजदान ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी सोनी यांच्याशी लग्न केलं.

महेश भट्ट यांनी लोरिएन ब्राइट यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. काही कारणास्तव या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सोनी राजदान आल्या आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सोनी यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांना धर्म बदलावा लागला होता. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता.

मुलीसह चुंबन घेणारा फोटो
80 च्या दशकात जेव्हा त्याची मोठी मुलगी पूजासोबतचा किस करतानाचा फोटो समोर आला तेव्हा महेश भट्ट वादात सापडले. महेश भट्ट यांनी पुजाला अनेक चित्रपटात दिग्दर्शन केले होते. मीडिया रिपोर्टमध्ये असेही दावे करण्यात आले होते की त्यावेळी महेश भट्ट यांनी विधान केले होते की पूजा भट्ट जर तिची मुलगी नसती तर त्यांनी तिच्या सोबत लग्न केले असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’