Take a fresh look at your lifestyle.

शाहिद कपूरने सुरू केले “जर्सी’चे शूटिंग…

0

चंदेरी दुनिया । बॉलिवुडमधील चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणार अभिनेता शाहिद कपूर याच्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश मिळविले आहे. या चित्रपटानंतर शाहिदने ‘जर्सी’ चित्रपट साईन केला होता. सध्या तो या चित्रपटाच्या तयारीत असून या चित्रपटाचे शूटिंग 13 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाचा क्‍लॅपबोर्ड शेअर करत शाहिदने याबाबत आपल्या चाहत्यांनी माहिती दिली.

हा चित्रपट तेलुगूमधील सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक असून यात एक स्पोर्टस ड्रामा आहे. या चित्रपटाचा क्‍लॅपबोर्डचा फोटो शेअर करत शाहिदने पोस्ट केले की, ‘आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी कधीही विलंब होत नाही. ‘जर्सी’चा प्रवास सुरू.’

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम टिन्नानूरी करत आहे. हा चित्रपट एका क्रिकेटपटूच्या जीवनावरील असून तो वयाच्या तिशीत राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याठी प्रयत्नशील असतो. यात शाहिद कपूरसोबत त्याचे वडील पंकज कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: