Take a fresh look at your lifestyle.

सलमानच्या आगामी ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ च्या शूटिंगला सुरुवात

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ च्या शुटिंगला २ ऑक्टोबरपासून कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये पुन्हा सुरूवात  होणार असून या १५ दिवसांच्या चित्रिकरणानंतर पॅचवर्कसाठी वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये अंतिम चित्रीकरण पार पडेल. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे तंतोतंत पालन करण्याबरोबरच टीम कलाकार आणि क्रू मेम्बर्सच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी देखील घेतली जाणार आहे. उच्च पातळीची सुरक्षा राखत असताना चित्रीकरण काळात कोणत्याही सदस्याला बाहेरील व्यक्तीला भेटण्याची परवानगी असणार नाही.

प्रोडक्शनच्या जवळील सूत्रांनी सांगितले की, “संपूर्ण क्रू ची प्राथमिक कोरोना टेस्ट करण्यात आली असून कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. दूसरे परीक्षण सेटच्या जवळच्या लोकांवर करण्यात येणार आहे ज्यामध्ये, अभिनेता आणि कोर टीम असेल. सलमान खान सेटवर पूर्ण सावधगिरी बाळगण्याबाबत आग्रही आहे. त्याच्या सल्ल्यानुसार, सेटवर एक डॉक्टर आणि एक विशेष टीम असणार आहे.”

सोहेल खान, सलमान खानचा भाऊ  आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती करत आहे, तो म्हणाला की, “आम्हाला आनंद आहे की राधेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’