Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानने नाकारलेल्या ह्या चित्रपटामुळे मुळे शाहरुख खान बनला बॉलिवूडवर राज करणारा प्रसिद्ध अभिनेता

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | असे म्हणतात की “दाने दाने पर खानेवाले का नाम रहता है” अशी एक हिंदी म्हण प्रचलित आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भाग्यामध्ये जेवढे लिहिलेले असेल तेवढेच मिळत असते. असेच काहीतरी सलमान याच्या बाबतीत घडले आहे. एका चित्रपटाला नकार दिल्यामुळे तो बॉलीवूड चित्रपट विश्वाचा बाजीगर ठरू शकला नाही. चला तर मग यामागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेऊया.

बॉलीवुडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानसाठी असे म्हंटले जाते कि, त्याला स्वतःला माहिती नसते कि, तो पुढल्या क्षणी काय करणार आहे. सलमान खानने आपल्या आता पर्यँत च्या चित्रपट करिअरमध्ये कित्येकदा चित्रपटाच्या ऑफर नाकारल्या आहेत. खरतरं यामध्ये काही खोटे नाहीये कारण सलमान खान बॉलीवुडचा एक मोठा सुपर​स्टार अभिनेता आहे. ज्याच्याजवळ प्रत्येक दिवशी शेकडो चित्रपटाच्या ऑफर येत असतात परंतु प्रत्येक चित्रपट सलमान खान करेल हे खूप अवघड काम आहे.

हेच कारण आहे कि, सलमान खान ने आपल्या करिअरच्या दरम्यान अनेक साऱ्या चित्रपटाच्या ऑफरला धुळकवून लावल्या होत्या. सलमान खानला अब्बास मस्तान यांचा सुपरहिट चित्रपट बाजीगर ऑफर झालेला, जो चित्रपट वर्ष १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सलमान खान ने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटांमध्ये अभिनेत्याची खलनायकी भूमिका होती, जे सलमान सिल्व्हर स्क्रीनवर करण्यास इच्छुक नव्हता.

या कारणामुळे सलमान खान हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि स्वतः या चित्रपटाचा करिता शाहरुख खान याचे नाव सुचविले. चित्रपट करण्यास शाहरूख खानने पसंती दर्शवली. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा होऊ लागली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला त्यामुळे शाहरुख खान च्या करियरला चार चांद लागले व त्याच्याकरिता यशाची वाट मोकळी झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’