Take a fresh look at your lifestyle.

‘सुशांतच्या चाहत्यांचा आवाज सर्वात तीव्र’; अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विट वर शेखर सुमनच प्रत्युत्तर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये नंतर अभिनेता शेखर सुमन सुशांतला न्याय मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार शेखरने सुशांतच्या आत्महत्ये वर भाष्य करून त्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.त्यातच अमिताभ बच्चन यांनी जगातील सर्वाधिक तीव्र ध्वनी कोणता याविषयी एक ट्विट केलं होतं. त्यावर शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया देत जगातला सगळ्यात तीव्र ध्वनी सुशांतच्या चाहत्यांचा असल्याचं म्हटलं आहे.

“नोंद करण्यात आलेल्या जगातल्या सगळ्यात तीव्र ध्वनीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांचा आवाज आहे. सुशांतला न्याय मिळावा म्हणून त्यांचा आवाज इतका तीव्र आहे की त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी जगाच्या असंख्या फेऱ्या मारुन येतील आणि अजूनही त्या फेऱ्या सुरु आहेत”, असं रिट्विट शेखर सुमन यांनी केलं आहे.

त्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं होतं की आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या जगातील सर्वात तीव्र ध्वनी हा ३ हजार मैलांपर्यंत ऐकू गेला होता. हा ध्वनी इतका मोठा होता की त्यातून निघालेल्या ध्वनीलहरींनी जगाला चक्क ३ फेऱ्या मारल्या होत्या. हा तीव्र ध्वनी क्रेकोटा या ज्वालामुखीतून निघाला होता. २७ ऑगस्ट रोजी हा पर्वत तुटला आणि त्यातून ३१० डेसिबलचा आवाज आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Comments are closed.