Take a fresh look at your lifestyle.

सुशांतच्या बहिणीने शेअर केले ‘हे’ भावनिक ट्विट ; चाहतेही झाले भावुक

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर सुशांतला देशभरात न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. सुशांतचे चाहते आणि त्याच्या जवळची माणसे सुशांतच्या आठवणीत त्याच्या संबंधित पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

याच दरम्यान, सुशांत सिंगची बहीण मितू सिंग यांनी तिचा दिवंगत भाऊ आणि दिवंगत आईच्या स्मृतीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने त्या दोघांना गमावल्याच्या वेदनांचे वर्णन केले आहे.

मीटू सिंग यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सुशांतच्या चाहत्याने बनविलेले एक चित्र आहे ज्यात सुशांतसिंग राजपूत त्याच्या आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. या चित्रासह, मीतू सिंगने एक अतिशय भावनिक कॅप्शन लिहिले आहे. तीने लिहिले, ‘माझी आई माझी ऊर्जा होती. माझ्या भावाचा मला अभिमान होता. या दोघांनाही मी पटकन गमावले. मी हे दुःख आणि या वेदना वेदना सहन करू शकत नाही.

13 जून रोजी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत नोव्हेंबर 2019 पासून नैराश्यात होता आणि मुंबईतील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. आता या प्रकरणाची आता बर्‍याच वेगवेगळ्या कोनातून तपासणी केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’