Take a fresh look at your lifestyle.

सुशांतच्या मृत्युला झाले तीन महिने ; अंकिता लोखंडेने शेअर केली ‘ही’ भावनिक पोस्ट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला तीन महिने झाले. सुशांतची माजी प्रेयसी आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सुशांतच्या स्मरणार्थ एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. अंकिता लोखंडे लिहिते, ‘काळ दूर उडून जातो. आयुष्य आपल्या वेगात पुढे जात राहते, परंतु काही आठवणी खास असतात ज्या कधीही विसरल्या जात नाहीत. त्या नेहमीच आपल्या जवळ असतात. विशेषत: त्या लोकांच्या आठवणी जे आपल्या जवळचे असतात. सुशांत, तू नेहमी आमच्या आठवणीत राहशील.

अंकिता लोखंडे यांनी सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेतासिंग कीर्ती आणि मेहुणे विशाल कीर्ती यांनाही या पोस्टमध्ये टॅग केले आहे. यासोबतच अंकिताने प्रियकर विक्की जैनलाही टॅग केले आहे. नुकतीच अंकिता लोखंडेही # प्लांट्स 4 एसआर सोशल मीडिया अभियानात सामील झाली. झाडे लावण्याची त्यांची अनेक छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. सुशांतची आठवण ठेवण्याचा आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा हा आमचा मार्ग आहे, अस अंकिता म्हणाली होती.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जूनला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. अभिनेत्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. सुशांतसिंग राजपूत प्रकरण दररोज नवं वळण घेत आहे. त्यातच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्याविरोधात ड्रग्स प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’