Take a fresh look at your lifestyle.

स्वतःच्या मुलीच्या बाबतीत अस झालं असत तर हेच बोलला असता का ; कंगणाने जया बच्चन याना सुनावले खडेबोल

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही वेळापूर्वी जया बच्चन यांनी संसदेत काही लोक बॉलिवूडची बदनामी करत असल्याचे भाष्य केले. पण जया बच्चन यांचे हे विधान ऐकल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतचा पारा चढला आहे. जया बच्चन यांचे विधान समोर आल्यानंतर लवकरच कंगणाने ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘जया जी, माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला मारहाण झाली किंवा तिचा कोणी विनयभंग केला असता किंवा तिला ड्रग दिले जात असते तर तुम्ही असेच बोलला असता का ?? जर अभिषेकने गुंडगिरीची आणि छळ केल्याची तक्रार केली आणि एखाद्या दिवशी तो लटकलेला दिसला तर ?? तर तेव्हाही तुम्ही असेच बोलाल का ?? आमच्याबद्दलही दया दाखवा.

दरम्यान जया बच्चन यांनी ड्रग्जच्या प्रकरणात समोर येत असलेल्या निवेदनातून बॉलिवूडच्या बदनामीबद्दल चिंता व्यक्त केली होती . त्या म्हणाल्या की, ‘काही लोक बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बॉलिवूडमध्ये बर्‍याच दिवसांपासून खळबळ उडाली आहे. असे काही लोक आहेत जे ज्या ताटात खातात त्याच ताटाला छेद करतात. ही एक चुकीची गोष्ट आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’