हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खानने त्यांना वंदन केलं. “वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका” असं म्हणत त्याने संपूर्ण देशाला गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. परंतु त्याच्या या ट्विटवर अभिनेत्री सयानी गुप्ता हिने प्रत्युत्तर दिले आहे. “गांधीजींनी आपल्याला खरं बोलायला देखील शिकवलंय” असं म्हणत तिने शाहरुखला टोला लगावला आहे.
शाहरुखने ट्विट केलं होतं की “या गांधी जयंतीला आपण आपल्या मुलांना अशी गोष्ट शिकवूया जी चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रसंगांमध्ये त्यांना मदत करेल. वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका हे गांधीजींचं तत्व आपल्या मुलांना शिकवा.”
शाहरुखच्या या ट्विट ला अभिनेत्री सयानीने प्रत्युत्तर दिले आहे. “सत्य बोलणं चांगलं आहे, पण गांधीजींनी आपल्याला सत्य बोलणाऱ्यांना पाठिंबा द्यायला देखील शिकवलं आहे. पीडितांसाठी आवाज उठवा, दलितांच्या हक्कांसाठी लढा. केवळ डोळे बंद करुन शांत बसू नका.” अस ट्विट करुन सयानीने शाहरुखला उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’