हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन | ‘छपाक’ या मेघना गुलजार यांच्या आणि दीपिका पदुकोण कलाकार आणि निर्माती अशा दुहेरी भूमिकेत दिसणाऱ्या चित्रपटाची सर्वानाच खूप उत्सुकता लागलेली आहे. ‘तलवार’ आणि ‘बाझी’ या चित्रपटांसोबत मेघना गुलजार यांना यशाचा फॉर्म्युलाच सापडला आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे या चित्रपटकडून अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.
लक्ष्मी अगरवाल यांच्या आयुष्यावर बेतलेल्या छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर 10 डिसेंबर रोजी 11 ते 3 च्या दरम्यान youtube वर रिलीज होणार आहे. या स्त्रीप्रधान चित्रपटाच्या ट्रेलर चांगले व्युव्ह्ज मिळवेल यात शंका नसली तरी, youtube सध्या चित्रपटाच्या भवितव्याचे टेस्ट ऍनालिसिस करण्याचे मिडीयम बनले आहे.
दीपिका पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम करतीय. त्यामुळे तिलाही लोकांच्या प्रतिक्रियेची आतुरता नक्कीच लागलेली असावी. दिपीकसोबतच चित्रपटात विक्रांत मासी दिसणार आहे. दीपिकाने आज ट्विट करून ट्रेलरची न्यूज दिली.
Discussion about this post