हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केला होता. त्यानंतर काही लोकांनी तीच समर्थन केले तर काहींनी तिच्या या वक्तवयाचा निषेध केला होता. त्यातच आता पायल घोष हिने ‘वाय श्रेणी’तील सुरक्षेची मागणी केली आहे. अनुराग विरोधात पोलीस तक्रार केल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्यांमुळे तिच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सरकारने पायलला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा द्यावी, अशी मागणी तिचे वकिल नितिन सातपुते यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना एक विनंती अर्ज देखील लिहिला आहे.
यापूर्वी मोदी सरकारने अभिनेत्री कंगना रणौतला Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली होती. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत तिचे शाब्दिक वॉर सुरू होता. तेव्हा कंगणाने देखील मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातायेत असा दावा केला होता. त्यामुळे केंद्राने तीला Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’