हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि नामांकित चित्रपट निर्माता, दिग्दर्शक महेश कोठारे 28 सप्टेंबर ला वयाच्या 67 व्या वर्षी पदार्पण करत आहेत.या निम्मित झी टॉकीज ने एका विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. महेश कोठारे यांनी थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला असे एकामागून एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित केले आहेत.
झी टॉकीज वरील या चित्रपट महोत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता ‘धुमधडाका’ या चित्रपटाने होणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डें, अशोक सराफ आणि महेश कोठारे या त्रिकुटाच्या अभिनयाने हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या नंतर ११ वाजता ‘दे दणादण’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डें यांनी या चित्रपटात एका हवालदाराची भूमिका साकारली आहे. तर महेश कोठारे हे पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत।
त्यानंतर महेश कोठारे यांचा माझा छकुला हा चित्रपट लागणार आहे. या चित्रपटात महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथने बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच या सिनेमामध्ये महेश कोठारे निवेदिता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डें, पूजा पवार, अविनाश खर्शीकर, विजय चव्हाण या कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका आहेत. दुपारी १.३० वाजता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महेश कोठारे यांच्या एकूण चित्रपटांपैकी ज्या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टी मध्ये इतिहास रचला असा आपल्या सर्वांचा आवडता विनोदी चित्रपट म्हणजे म्हणजे ‘झपाटलेला’. संध्याकाळी ७ वाजता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपट महोत्सवाचा शेवट ‘थरथराट’ या सुपरहिट सिनेमाने होणार आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डें, निवेदिता सराफ या कलाकारांच्या या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’