हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | शिवसेनेने पुन्हा एकदा मुखपत्र सामनाच्या माध्यमातून कंगना रनौतला लक्ष्य केले आहे.कंगणावर मुंबईचा अपमान केल्याचा आरोप आहे. कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना बाबरशी केली आणि मुंबई शहराचे वर्णन पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणून केले परंतु तरीही बॉलिवूडचा एक भाग त्यावर मौन बाळगत आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केले नाही की कंगनाचे मत हे संपूर्ण बॉलिवूडचे मत नाही.
अक्षय कुमार वर टीका –
सामनातुन अस म्हणलं आहे की अक्षय कुमारला मुंबईने बरेच काही दिले आहे. या स्वप्नांच्या शहरात त्याने अफाट यश मिळवले आहे, परंतु तरीही त्याने कंगनाच्या विरोधात एक शब्दही काढला नाही. मुंबईचा अपमान झाला पण त्याने विरोध केला नाही. संपूर्ण नाहीत, किमान हिंदी चित्रपटसृष्टीतील निम्मे तरी मुंबईतील अपमानाचा निषेध म्हणून पुढे यायला हवे होते.कंगनाचे मत हे संपूर्ण चित्रपट जगाचे मत नाही, असे म्हणायला हवे होते. किमान अक्षय कुमार सारख्या मोठ्या कलाकारांनी तरी हजेरी लावायला हवी होती.
शिवसेनेने कंगना प्रकरणात संपूर्ण बॉलिवूडवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांच्या मते जेव्हा जेव्हा मुंबईचा अपमान होतो, तेव्हा हे सर्व कलाकार मुख गिळून गप्प बसतात. त्या अपमानाविरूद्ध ते एक शब्दही बोलत नाहीत.- जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. परंतु जेव्हा मुंबईचा अपमान होतो तेव्हा ते सर्वजण मान खाली घालून बसतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’