हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर धमकावल्याचा आरोप करताना कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर सोशल मीडियावर कंगणावर टीकेची झोड उठली होती.त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. आता कंगनाने नुकाताच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईची तुलना काश्मीरशी करण्यावर वक्तव्य केले आहे.
नुकतीच कंगनाने ‘टाइम्स नाऊ’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने, ‘मला हरामखोर म्हटले गेले. त्यामुळे मला हे मुंबईसारखे वाटले नाही. हे सर्व पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटले. नंतर त्यांनी याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
पुढे ती म्हणाली, ‘मी पीओके म्हणाले पण मला सीरिया म्हणायला हवे होते. कारण जेव्हा राहूल गांधी म्हणतात त्यांना भारत सीरियासारखा वाटतो तेव्हा कोणीही त्यांना त्रास देत नाही आणि त्यांचे घर तोडत नाही. या लोकांची नेमकी समस्या काय आहे?’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’