हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा (Viscera) रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषकण आढळले नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट AIIMS कडून सोमवारी सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने, त्याच्यावर विषप्रयोग केला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या तपासाकरिता AIIMS च्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. याच विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट सादर केला आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना क्लीन चीट दिली नसल्याचंही समोर येतं आहे.कूपर रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते. एम्सचा रिपोर्ट हा इशार करत आहे की, कूपर रुग्णालयाकडून सुशांत प्रकरणात निष्काळजीपणा करण्यात आला. कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सने सुशांतची ऑटोप्सी केली. ज्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’