Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चाहता असावा तर असा! सोनू सूदच्या पोट्रेटसाठी वापरलेले 2500 किलो तांदूळ गरजुंना दान करणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonu Sood
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद हा त्याच्या अभिनयापॆक्षा जास्त सामाजिक कार्य आणि दानशूर कृतींमुळे चर्चेत असतो. कोरोना काळात त्याने लोकांना इतकी मदत केली कि त्याला ‘मसिहा’ म्हटलं गेलं. यानंतर सोनुने त्याच काम थांबलं नाही तर सामाजिक कार्यात तो सतत अग्रेसर राहताना दिसला. यामुळे दिवसेंदिवस त्याचा चाहता वर्ग वाढू लागला. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी सोनू सूदची देवासारखी पूजा केली जाऊ लागली. काही ठिकाणी तर सोनू सूदच्या प्रतिमांचे पूजन, फोटोवर दुधाचा अभिषेक करताना लोक दिसले. यानंतर आता आणखी एका चाहत्याने सोनू सुदवरील प्रेमाखातर तब्बल २५०० किलो तांदूळ वापरून त्याचे छायाचित्र तयार केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

होय. तुम्ही बरोबर वाचलात. सोनू सूदच्या काही चाहत्यांनी मिळून तब्बल २५०० किलो तांदळाचा वापर करुन जमिनीवर अभिनेत्याचे एक मोठे छायाचित्र बनवले आहे. जे पाहून तुम्ही थक्क झाले नाही तर नवलंच! एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मध्य प्रदेशातील देवास येथील तुकोजी राव पवार स्टेडियममध्ये सोनू सुदचे काही चाहते आणि एका स्वयंसेवी संस्थेने १ एकरहून अधिक जमिनीवर हा फोटो तयार केला आहे. सोनू सूदची हि प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांनी २५०० किलो तांदूळ वापल्याचे सांगितले जात आहे. या छायाचित्रासाठी वापरण्यात आलेला हा तांदूळ ‘हेल्पिंग हँड्स’ एनजीओच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना दान करण्यात येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

या छायाचित्राचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. स्वतः सोनू सूदनेदेखील हे छायाचित्र बनवतानाचा व्हिडीओ शेअर करीत कृतज्ञता व्यक्त केली आहे, सोबतच सोनू सूदने या प्रेमासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला कि, ‘मला प्रत्येक वेळी मिळणारे प्रेम आणि कौतुक अवास्तव आहे. इतरांना मदत करण्यासाठी चाहते त्यांच्या क्षमतेनुसार हे सर्वकाही करत आहेत ते मला आवडते. हे सर्व पाहिल्यानंतर माझं मन भरून येतं. मी याच्यापेक्षा जास्त आभारी आणि कृतज्ञ असू शकत नाही’.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

अभिनेता सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सध्या तो अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत आगामी सिनेमा ‘फतेह’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या शूटिंग दरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tags: bollywood actorInstagram PostSonu SoodViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group