हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मुंबई येथे ६६ वे फिल्मफेअर अवॉर्ड फेस्टिवल पार पडले. या फिल्मफेअर पुरस्कारांत “थप्पड” हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी तापसी पन्नू हिला “सर्वोकृष्ट नायिका” म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. तसेच थप्पडला मिळालेला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तापसी पन्नूसाठी मोठे यश असल्याचे मानले जात आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित झालेला “थप्पड” चित्रपट सामाजिक विचारधारणेवर टीका करणारा आहे. त्यामुळे घरगुती हिंसाचारास विरोध दर्शविणारा “थप्पड” प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटातील भूमिकेतून एक अभिनेत्री म्हणून तापसीने नवा पायंडा घातला आहे. त्यामुळे तिने साकारलेली व्यक्तिरेखा ही विसरण्याजोगी नाही हे खरं.
तापसी ही मूळ तमिळ आणि तेलगू भाषिक नायिका आहे. तिने डेविड धवन यांच्या चष्मे बद्दुर या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये एंट्री केली. त्यानंतर पिंक, नाम शबाना, मनमर्झिया, सांड की आँख इ. चित्रपटांतून तापसी मुख्य भूमिकेतून झळकली. तापसीने भूषविलेल्या सर्व भूमिका या वास्तवदर्शी आणि लक्षवेधक असतात. यामुळेच अमृता हे पात्र साकारण्याची संधी तापसीला मिळाली.
फिल्मफेअर पुरस्काराचे अन्य मानकरी पुढीलप्रमाणे :-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ओम राऊत (तानाजी), सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)- अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो), सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- राजेश कृष्णन (लुटकेस), सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- फराह खान (दिल बेचारा), सहाय्यक अभिनेत्री- फारुख जाफर (गुलाबो सिताबो), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सैफ अली खान (तानाजी), सर्वोत्कृष्ट गायिका- असिस कौर (मलंग), सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक- राघव चैतन्य (थप्पड), सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम (लूडो)
Discussion about this post