हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये किरण माने टॉप ३ पर्यंत पोहोचले होते. पण जिंकू शकले नाहीत. असे असले तरीही परजायचं दुःख त्यांना वाटलं नाही. याच कारण म्हणजे चाहत्यांनी दिलेलं प्रेम. खेळ संपला,शो संपून बरेच दिवस झाले पण अजूनही मानेंचे चाहते ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करत आहेत, प्रेमाचा वर्षाव करत आहेत. माने नुकतेच आजोळी गेले होते आणि यावेळी त्यांची भेट नानू आज्जीसोबत झाली. जिचं वय ९५ असून तिला भले खेळातले काही समजत नसेल पण तिच्या मायेला तोड नाही याचा प्रत्यय मानेंना आला.
किरण मानेंनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शजनमध्ये लिहिलं आहे कि, ‘…बिग बाॅस’मधलं या आज्जीला काय कळत नव्हतं… वय वर्ष ९५… फकस्त माझ्या म्होरं ल्हानाचा मोट्टा झालेला किरन त्यात हाय म्हनून रोज बिग बाॅस सुरू होताच मला बघन्यासाठी टीव्हीपुढं बसनारी ही नानु आज्जी! माझ्या आजोळची, बारामती जवळच्या कोर्हाळे बुद्रुक मधल्या मोरे वस्तीवर र्हानारी. मला बघताच तिला आनंदाचं भरतं आलं. लै भारी खेळलास रं माझ्या राजा, म्हनत माझ्यावर मायेचा वर्षाव केला तिनं.
पुढे लिहिलंय, ‘खरंच मी लै भाग्यवान हाय असं मला वाटायला लागलंय. रोज वेगवेगळ्या गांवात, घराघरात माझे सत्कार चाल्लेत. मी लै मोठं काहीही केलेलं नाय… पन मनोरंजनाच्या दुनियेत, माझ्या मातीतल्या मानसांना निखळ आनंद देनारं, अभिमान वाटनारं कायतरी घडलंय माझ्या हातनं एवढं नक्की ! आन् हीच भावना मला लै लै लै बळ देतीय. नवी उर्जा, नवी शक्ती घेऊन पुढच्या प्रवासाला सुरूवात करतोय’. किरण मानेंच्या या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यातील त्यांच्या एका फॅन पेज मेकरने कमेंटमध्ये लिहलंय कि, ‘किरण सर तुम्ही इतके प्रेमळ आणि मनमिळाऊ आहात ना त्यामूळे आक्खी दुनिया तुमच्यावर मायेचा वर्षाव करतेय, आक्ख्या दुनियेला तुमचा अभिमान होता, आहे आणि कायम राहिल सर. लवकरात लवकर न्यू प्रोजेक्ट घेऊन या आतुरतेने वाट पाहत आहोत’.
Discussion about this post